रग्णसेवेद्वारे आमदार शंकर जगताप यांचा वाढदिवस साजरा

पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे  आमदार शंकर जगताप यांचा वाढदिवस  विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त  रावेत परिसरात स्वच्छता अभियान व वृक्षारोपण करण्यात आले होते. तसेच चिंचवड येथील तालेरा हॉस्पिटलमध्ये  रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

 
याप्रसंगी रावेत-काळेवाडी भाजप मंडळ अध्यक्ष  सोमनाथ भोंडवे,  युवा नेते  दिपक मधुकर भोंडवे, माजी नगरसेवक  राजेंद्र गावडे, भाजपा पदाधिकारी सचिन बंदी,  अजय भोंडवे, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पर्यावरण प्रेमी भास्कर भोसले आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास होत आहे. हा मतदारसंघ राज्यात विकासकामांबाबत रोड माॅडेल झाल्याशिवाय राहणार नाही, असा  विश्वास दीपक मधूकर भोंडवे यांनी या वेळी व्यक्त केला. तसेच रावेत, किवळे, मामुर्डी, साईनगर, विकासनगर भागातील जनतेच्या वतीने आमदार जगताप यांनी दिर्घायुष्य मिळो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
Share

Leave a Reply