चिखलीतील टाऊन हॉलला दिवंगत दत्ताकाका साने यांचे नाव द्या: स्वराज्य पक्षाची मागणी

पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र

चिखली, सोनवणे वस्ती येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या टाऊन हॉल या इमारतीला पिंपरी चिंचवड महापालिकेचे  माजी नगरसेवक तथा विरोधी पक्ष नेते दिवंगत दत्ताकाका साने यांचे नाव देण्याची मागणी स्वराज्य पक्षाचे शहर निमंत्रक विजय जरे यांनी केली आहे.

या संदर्भात जरे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. दिवंगत नगरसेवक तसेच विरोधीपक्ष नेते स्व. दत्ताकाका साने यांचे चिखली मोरेवस्ती परिसराच्या विकासात मोठे योगदान आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी दमदार कामगिरी केली होती.

तसेच कोरोना काळातील त्यांची जनसेवा अविस्मरणीय आहे.  परिसरात ते लोकनेते म्हणून ते ओळखले जात होते. आजही स्थानिक नागरिकांना दत्ताकाका साने यांच्या कार्याचा विसर पडलेला नाही. अशा लोकनेत्याच्या कार्याला न्याय देण्यासाठी चिखली, सोनवणे वस्ती येथील महापालिकेच्या टाऊन हॉलला दिवंगत दत्ताकाका  साने असे नाव देण्यात यावे. तसेच या नामकरणासाठी येणारा संपूर्ण खर्च  करण्यास आम्ही तयार असल्याचे जरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Share

Leave a Reply