‘खोटं पण रेटून’ बोलण्यासाठी आता उपमुख्यमंत्र्यांना आणावे लागले – यश साने

-दहा वर्ष नगरसेवकांच्या कामाचे क्रेडिट लाटले, आता उपमुख्यमंत्र्यांना आणले – यश साने

– देवेंद्र फडणवीस यांची चिखलीत सभा ; सभेवरून आमदारांना सुनावले खडे बोल

-विरोधकांना पराभव समोर दिसू लागल्याने उपमुख्यमंत्र्यांना चिखली आणावे लागले- यश साने

-विरोधकांना चिखलीत उपमुख्यमंत्र्यांना आणावे लागते यातच त्यांचे अपयश- यश साने

भोसरी 16 नोव्हेंबर:

चिखली, मोशी या पट्ट्यामध्ये दिवंगत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने यांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा निंदनीय प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. मात्र येथील सुज्ञ जनता भाजपा आमदारांच्या भूलथापांना बळी पडली नाही. त्यामुळेच विरोधकांना या भागात उपमुख्यमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणावे लागले हीच आमदारांच्या अपयशाची पोचपावती असल्याची खरमरीत टीका विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष यश साने यांनी केली आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे यांना उमेदवारी दिली आहे भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मोशी, चिखली, साने वस्ती मोरे वस्ती या समाविष्ट भागांचा महत्वपूर्ण सहभाग आहे. या समाविष्ट गावांनी यंदाच्या निवडणुकीसाठी परिवर्तनाची भूमिका घेतली आहे. या भागांमधून अजित गव्हाणे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रचार दौऱ्यामध्ये हजारो नागरिक सहभागी होताना पाहायला मिळत आहे. स्वयंस्फूर्तीने युवकांचा सहभाग लक्षणीय ठरत आहे.

याबाबत यश साने म्हणाले, चिखली, मोशी हा भाग दिवंगत दत्ता काकासाने यांचा हा गड मानला जातो. येथील नागरिक दिवंगत दत्ता काका साने यांचे काम विसरलेले नाही. विरोधकांना या भागांमध्ये कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सत्ताधा-यांचे धाबे दणाणले आहेत. सत्ताधारी आमदारांनी आजन्म नगरसेवकांच्या कामाचे क्रेडिट लाटले. हेच कामाचे क्रेडिट आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडून सत्ताधारी आमदारांना वदवून घ्यायचे आहे. ‘खोट बोल पण रेटून बोल’ असा यांचा कारभार आहे. आता हेच खोटं उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडून बोलून घ्यायचे असल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांची चिखली म्हेत्रे वस्ती येथे सभा आयोजित करण्यात आली. हेच सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. काका साने यांनी आपल्या कामातून या भागांमध्ये विकास कामांचा डोंगर उभा केला त्यांच्याच कामाचे क्रेडिट लाटण्याचे उद्योग गेली दहा वर्ष सत्ताधाऱ्यांनी केले. नागरिक या खोटेपणाचा हिशोब येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना भरभरून देऊन करणार आहेत असे देखील यश साने यांनी म्हटले आहे

Share

Leave a Reply