कन्हैया कुमार यांना ईशान्य दिल्लीतून संधी

नवी दिल्ली: टीम न्यू महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने ईशान्य दिल्लीतून युवा नेते कन्हैया कुमार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. चांदणी चौक मतदारसंघामधून जे. पी. अगरवाल, तर वायव्य दिल्लीतून उदित राज यांना तिकीट देण्यात आले आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांना जालंधर मतदारसंघातून मैदानात उतरविण्यात आले आहे.

काँग्रेसने रविवारी रात्री १० उमेदवारांची यादी जाहीर केली. दिल्लीत पक्ष तीन जागांवर निवडणूक लढविणार असून, तिन्ही जागांवरील उमेदवार आज घोषित करण्यात आले. पंजाबमधील अमृतसरमध्ये गुरजितसिंग औजला, जालंधरमध्ये चरणजितसिंग चन्नी, फतेहगड साहिब मतदारसंघात अमरसिंह,

भटिंडामध्ये जीत मनोहरसिंग सिद्धू, संगरूर मतदारसंघात सुखपालसिंग खैरा तसेच पतियाळा मतदारसंघात धर्मवीर गांधी यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील अलाहाबाद मतदारसंघात पक्षाने उज्ज्वल रेवती रमण सिंह यांना तिकीट दिले आहे. दिल्लीमध्ये लोकसभेच्या सात जागा आहेत. गतवेळी या सर्व जागा भाजपने जिंकल्या होत्या.

Share

Leave a Reply