महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना ‘लोकगौरव’ पुरस्कार

पुणे : टीम न्यू महाराष्ट्र

येथील लोकमान्य सोसायटीच्या वतीने महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांना ‘लौकगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डीपी रस्त्यावरील पंडित फार्म येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर यांच्याहस्ते मुख्य अभियंता श्री. पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महावितरणच्या पुणे परिमंडलातील ग्राहकसेवा व वितरण यंत्रणेतील लोकाभिमुख सुधारणांसाठी प्रशासन विभागातून मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

Share

Leave a Reply