राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचा निकाल उजळला : विज्ञान शाखेचा निकाल १००%, अन्य शाखांचाही उल्लेखनीय टक्का

भोसरी ः टीम न्यू महाराष्ट्र
इयत्ता बारावीच्या शैक्षणिक वर्ष २४-२५  परीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यामध्ये राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी भोसरी पुणे येथील कनिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.
शाखानिहाय निकाल पुढीलप्रमाणे
कला  ः ८९%
वाणिज्य ( मराठी माध्यम) ः ९०.८१%  (इंग्रजी माध्यम). ९६.३५
विज्ञान ः १००%
प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविणारे  शाखानिहाय विद्यार्थी 
 कला शाखा ः पूनम सावंत विश्वास ८२.३३%,  सागर सुरेश. ७७.६७%,  शाही हरिकला ७५.५०%.
  वाणिज्य ( मराठी माध्यम) ः   फावडे अमृता ७७.८३ %, साळुंखे मनीषा ७६.३३ %, सोनवणे विजय ७३.३३%.  (इंग्रजी माध्यम) ः  राणे सिद्धी संतोष ८६.००%, गौंड रितू सुनील कुमार ८२.५०%,  खेडकर तनिष्क मंगेश ८१.१७%.
 विज्ञान  ः  कुलकर्णी अथर्व विनायक ८३.६७%, जगदाळे शुभदा लालासाहेब ८१.००%,
वाडेकर प्रज्ञेश ७७.६७%.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार  विलास लांडे यांनी अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. सचिव   सुधीर मुंगसे , खजिनदार  अजित  गव्हाणे, विश्वस्त  विक्रांत लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.जी. कानडे, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, उपप्राचार्या डॉ. नेहा बोरसे, रजिस्ट्रार  अश्विनी चव्हाण , सर्व विभाग प्रमुख सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Share

Leave a Reply