भाजप कामगार माेर्चा प्रदेश कार्यकारीणी सदस्यपदी रामचंद्र भोसले

मंबई : टीम न्यू महाराष्ट्र 

पिंपरी चिंचवड शहरातील रामचंद्र तथा तात्या भोसले यांची भाजप कामगार मोर्चाच्या प्रदेश कायर्कारी सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निवडीचे शहरातील कामगार वर्गातून स्वागत केले जात आहे.

भाजप कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांनी ही निवड जाहिर केली. मुंबईतील  भाजप प्रदेश कार्यालयात कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते भोसले यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या वेळी चित्रपट अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. भोसले यांनी भाजप कामगार मोर्चा पिंपरी चिचंवड शहर सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली आहे. आता त्यांना थेट प्रदेश कार्यकारीणीत काम करण्याची संधी देण्यात आली आहे.

पदाच्या माध्यमातून  विविध क्षेत्रातील संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना भाजपमध्ये सहभागी करुन पक्ष संघटन वाढविण्यासाठी परिश्रम घेणार असल्याचे रामचंद्र भोसले यांनी निवडीनंतर सांगितले.

 

Share

Leave a Reply