भजन सादरीकरण महोत्सवास प्रतिसाद

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सांस्कृतिक संवर्धन व विकास महासंघ विभागाच्या अंतर्गत संस्कृती संवर्धन भजन महासंघ चिखली विभागाने आषाढ मासनिमित्त संभाजीनगर येथील श्री साई मंदिरात आयोजित भजन सादरीकरण महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला.

चिखली परिसरातील १४ महिला भजनी मंडळांनी भजन सादरीकरण केले. कार्यक्रमात श्री गजानन बाल भजनी मंडळाचे सादरीकरण लक्षवेधी ठरले. यावेळी माजी महापौर मंगला कदम, सार्थक टिव्हीएस शोरुमचे सर्वेसर्वा सुनील बर्गे,  रवी कळमकर, प्रदीप पाटील, राजेंद्र देशपांडे, भास्कर रिकामे, ह.भ.प. गायत्री थोरबोले, माऊली देशमुख, मनीषा बर्गे, कीर्ती जाधव, मनीषा गटकळ, सारिका पवार, रिटा सानप, आदी उपस्थित होते.

प्रत्येक भजनी मंडळाने संस्कार वर्ग व बालकांसाठी प्रबोधन कार्यशाळा सुरू कराव्यात, असे मत संस्कृती संवर्धन भजन महासंघाच्या अध्यक्षा अर्चना सोनार यांनी व्यक्त केले. शिवानंद चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply