तब्बल ९० गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगारास अटक

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

तब्बल ९० गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात
घरफोड्यास व चोरीचे दागिने विकत घेणार्‍या सराफाला निगडी पोलिसांनी
जेरबंद केले. त्याच्याकडून २५ लाख ३ हजार ४५० रुपये किंमतीचा माल जप्त
केला.
विकीसींग जालींदरसींग कल्याणी (रा. रामटेकडी, हडपसर) असे चोरट्याचे नाव
आहे. तर, अब्दुल्ला ताहीरबक्ष शेख (वय ५८, रा. लोहगाव) असे सराफाचे नाव
आहे. आरोपी कल्याणी याच्यावर यापुर्वी दरोडा, घरफोडी, जबरी चोरी, खुन,
खुनाचा प्रयत्न आदी गंभीर ९० गुन्हे दाखल आहेत. प्राधिकरण – निगडी येथील
श्रीलक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकानात चोरी झाल्याचे २६ मे रोजी सकाळी
उघडकीस आले. चोरट्याने शटर उचकटून आतील ३० तोळे सोन्याचे दागिने, १० किलो
चांदी, रोख रक्कम १८ हजार रुपये व तेथील डिव्हीआर चोरुन नेला. याबाबत
निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली.
पोलिसांनी घटनास्थळ आणि आजुबाजुच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.
त्यामध्ये आरोपींनी एक लाल रंगाची गाडी वापरल्याचे निष्पन्न झाले. त्या
गाडीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सरकारी व खासगी असे एकूण ३००
सीसीटीव्ही तपासून संशयित गाडी हडपसर भागात गेल्याचे निष्पन्न केले.
पोलिसांनी ३० मे रोजी रात्री एकच्या सुमारास त्याच्या घरात घुसून अटक
केली. कल्याणी याला गुन्हयात वापरलेल्या वाहनासह ताब्यात घेतले. तो नेहमी
पत्ते बदलून राहत होता. आरोपीने पूर्वी पोलिसांवर फायरींग केली आहे.
आरोपीने चोरलेला ऐवज सराफ शेख याला विकल्याने त्यालाही अटक केली.
सोनाराकडून १०० ग्रॅम सोन्याची लगड, ८ किलो ३०० ग्रम वजनाची चांदीची विट
जप्त केली. तसेच, आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी, घरफोडीचे सहित्य व
दोन तलवार असा २५ लाख रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस
आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त स्वप्ना
गोरे, सहायक आयुक्त राजु मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निगडीचे वरिष्ठ
निरीक्षक शत्रुघ्न माळी, तेजस्वीनी कदम, सहायक निरीक्षक अंबरिष देशमुख,
अतिंग्रे, उपनिरीक्षक रायकर, अंमलदार भगवान नागरगोजे, सुधाकर अवताडे,
सिद्राम बाबा, भुपेंद्र चौधरी, राहुल गायकवाड, विनोद होनमाने, दत्तात्रय
शिंदे, तुषार गेंगजे, विनायक मराठे, सुनील पवार, केशव चेपटे, प्रविण
बांबळे, कविता वावरे, स्नेहा म्हस्के, राजेंद्र बारशिंगे, शांताराम
हांडे, विजय जानराव, समीर ढवळे, गणेश काकड, दिनेश पुंडे, सचिन आचार्य,
दत्ता कवठेकर, तांत्रिक विश्लेषक नुतन कोंडे, सीसीटीव्ही कंट्रोल रुम
येथील स्वप्नाली म्हसकर, सारीका अंकुश यांनी केली.

Share

Leave a Reply