निगडी येथे तुकोबांच्या पालखीतील वारकऱ्यांची अन्नदानरुपी सेवा

 निगडी ः टीम न्यू महाराष्ट्र
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त श्री संत तुकाराम महाराज व्यापार संकुलन व शिवतेज प्रतिष्ठान निगडी यांच्या वतीने सोहळ्यायात  सहभागी सर्व वारकरी बंधू व भगिनींचे स्वागत करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.  
 पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालय प्रशासनाच्या वतीने आषाढी पालखी सोहळा २०२४  करिता माहिती पुस्तिका प्रत्येक दिंडीस देण्यात आली.  या पुस्तिकेमध्ये पालखी मार्गावर असलेल्या सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक पुरविण्यात आलेले आहेत.
तसेच निगडी येथे संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवसेना (उबाठा ) शहर संघटक संतोष सौंदणकर, शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश वाडकर, सुनील म्हासके,  शहर सचिव ज्ञानेश्वर शिंदे, नुरबागवान शेख, प्रफुल पोटफोडे, शैलेंद्र परंडवाल, पंडित दगडे, रघुनाथ शेट्टी, ओमप्रसाद परदेशी आदी उपस्थित होते.
Share

Leave a Reply