शाहांचा फडणवीसांना फोन; राजीनाम्याविषयी चर्चा?

मुंबई: टीम न्यू महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. केवळ 9 तर महायुतीला एकूण 17 जागा मिळाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. काल भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेत झालेल्या भाजपच्या पराभवानंतर एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी माझी असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत जाणार असून नरेंद्र मोदी तसेच अमित शाह यांची भेट घेणार आहेत. मात्र या भेटीपूर्वीच आज सकाळी अमित शाह यांनी स्वत: देवेंद्र फडणवीस यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. देवेंद्र फडणवीस यांच्या मनात नेमकं काय चालंलय ते ऐकून, त्यांच्या भावना अमित शाह यांनी जाणून घेतल्या आणि या मुद्यावर फडणवीस दिल्लीत आल्यावर प्रत्यक्ष भेटीत चर्चा करू, असेही अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.

Share

Leave a Reply