पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
दक्षिण कोरिया येथे संपन्न झालेल्या 2024 एशिया कप स्टेज 3 या स्पर्धेत महिला सांघिक रिकर्व्ह प्रकारात या स्पर्धेत नेहरूनगर येथील शर्वरी शेंडेला रौप्यपदक मिळाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या या स्पर्धेसाठी भारतामधून चार विद्यार्थींची निवड झाली होती त्यामध्ये शर्वरीचा समावेश होता.
शर्वरी ही जी. जी. इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे. ती नेहरूनगर येथील स्वराज्य आर्चरी अकॅडमी मधून प्रशिक्षण घेत आहे. तिला प्रशिक्षक कुणाल तावरे यांचे मार्गदर्शन लाभले. शर्वरी राज्यस्तरीय लेव्हलला अनेक ठिकाणी खेळले असून नुकतीच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून तिची आर्चरी स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेत जिंकल्यामुळे आपले मनोबल वाढले असून ऑलम्पिक साठी यातून तयारी सुरू असल्याचे शर्वरीने सांगितले.
शर्वरीने या आधी राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेमध्ये ५० हून जास्त मेडल जिंकले आहेत. ती २०१७ पासून स्वराज्य आर्चरी अकादमी येथे सराव करत आहे.
तिने खेलो इंडिया यूथ गेम्स चेन्नई येथे १ सुवर्ण आणि एक कांस्य पदक पटकाविले आहे.