चिखली : टीम न्यू महाराष्ट्र
पूर्णा नगर-शिवतेजनगर परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याच्या समस्येने जनतेचे प्रचंड हाल होत असल्याने तसेच महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.
पुर्णानगर येथील महावितरण कार्यालयासमोर शिवसेनेचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उपशहरप्रमुख अनिल सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसैनिकांसह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनीही सहभाग घेतला. परिसरातील वीजेच्या समस्यांचे तात्काळ निवारण करण्याच्या मागणीचे निवेदन महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले. त्यावर पुर्णानगर परिसरातील विद्यूत ट्रांसफार्मर वअंतर्गत केबल कॅपॅसिटी यावर तत्परतेने उपाय करून करून त्या संदर्भात प्लॅन तयार करून पुढील नियोजन करण्यात येईल, असे आश्वासन महावितरणचे कार्यकारी अभियंता देवरे यांनी दिल्याची माहिती अनिल सोमवंशी यांनी दिली.
याप्रसंगी अनिल सोमवंशी, विक्रमादित्य पवार, शैलेश मोरे, सचिन सानप, सुनील कदम,ऋषिकेश जाधव,विकास गर्ग, प्रदीप खोत, विनोद रोकडे, जयवंत काळे, दीपक पाटील,दत्त्तात्रय भोर, लक्ष्मण देसाई,अविनाश शिंदे योगेश शिरसाठ, माणिक पाटील, गोविंद तांबवडे, तान्हाजी तामाने, बापू ढेकळे, डॉ. सागर वागज, प्रवीण नरोडे, विश्वास देशपांडे, दिगंबर लवटे, मच्छिन्द्र शेळके, हरिप्रसाद वाबळे, शशिकांत जगताप व परिसरातील नागरिक उपस्थित होते.