लोणावळ्यात शिवसेनेच्या वृक्ष पंधरवड्याला प्रारंभ

लोणावळा : टीम न्यू महाराष्ट्र

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना मावळ तालुका परिवाराच्या वतीने लाेणावळा येथे वृक्षारोपण करण्यात आले.

शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र म्हात्रे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.  शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांच्या पुढाकाराने  शिवसेनेच्या वतीने  दरवर्षी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष पंधरवड्याचे आयोजन केले जाते. त्यानुसार यंदाही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या वेळी माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, सतिश गोंटे, भावेश खराडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply