मामुर्डी येथील बरलोटानगरातील रहिवाशांची मागणी
पिंपरी : टीम न्य महाराष्ट्र
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील मोकाट कु्त्र्यांचा उपद्रव वाढला आहे. मामुर्डी येथील बरलोटा नगर भागात नागरिकांना घराबाहेर पडताना भीती वाटत आहे. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत ह्युमन राईट असोशिएशन फॅार प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी यांच्या वतीने स्थानिक त्रस्त नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. प्रशासनाच्या वतीने आरोग्य अधिकारी किरण गोंटे यांनी निवदेन स्वीकारले तसेच या प्रश्नी तोडगा काढण्याचे आश्नासन दिले.
देहूरोड परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बालकांसह ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळेकरी मुले व नागरिकांना चावा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा नागरिकांवर मोकाट कुत्र्याकडून हल्ले झाले आहेत. काही मोकाट कुत्री वाहनांचा पाठलाग करतात. दुचाकी वाहनांचा पाठलाग करताना अपघाताचा धोका असतो. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी निवदेनात करण्यात आली आहे.
यावेळी संतोष रमेशन. विकी बनसोडे, ओमप्रकाश पिल्ले, अजय कमल सन्ना, जावेद जमादार आदी उपस्थित होते.