मावळ: टीम न्यू महाराष्ट्र
मावळ तालुक्यामध्ये सिद्धांत इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित कबड्डी स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्पर्धांना हजेरी लावत आपला प्रतिसाद नोंदवला.
क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य,पुणे व सिद्धांत इंटरनॅशनल स्कूल सूदुंबरे तालुका- मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुका स्पर्धेचे आयोजन 9 व 10 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले होते .व्हीपीएस संघाने पंडित नेहरू विद्यालय कामशेत संघाला पराभूत करून 19 वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम विजेतेपद प्राप्त केले.
यावेळी दिपाली जानकर हिची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. आंतरभारती बालग्राम शाळा लोणावळा संघाने नवलाख उंबरेच्या श्रीराम विद्यालयाचा पराभव करून 17 वर्षाखालील विजेतेपद प्राप्त केले.पायल ठाकूर या खेळाडूला उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळाला. आंतरभारती बालग्राम लोणावळा संघाने उत्तम खेळ दाखवत 14 वर्षाखालील मुलींच्या संघाने न्यू इंग्लिश स्कूल भोयरे संघाला चित्तपट केले . लक्ष्मी घोष उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
14 ,17 व 19 वर्षाखालील मुले व मुली गटात एकूण 140 संघांनी सहभाग नोंदवला होता मुलांच्या 14 वर्षाखालील हायव्हिजन नायगाव यानी प्रथम विजेतेपद प्राप्त केले .चेतन कालेकर याची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. 17 वर्षाखालील प्रगती विद्यामंदिर इंदोरी सागर राठोड याची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली व 19 वर्षाखालील पंडित नेहरू हायस्कूल आयुष शेलार याची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली या संघाने प्रथम क्रमांक मिळवला.
संपूर्ण स्पर्धेचे उद्घाटन सिद्धांत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष सिद्धांत यादव , संचालिका याशिका यादव , सिद्धांत स्कूलचे संचालक राजेश जाधव, प्राचार्य सुप्रिया साळुंखे यांच्या हस्ते झाले तसेच सिद्धांत स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा यात सहभाग होता.