तळवडे ः टीम न्यू महाराष्ट्र
तळवडे येथील बालाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना फाळके यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाची माहिती दिली. तसेच योगाचे महत्व समजावून सांगितले. योगशिक्षिका अपर्णा यादव व विद्या बुचडे यांनी विविध आसनांची प्रात्यक्षिके सादर केली. या वेळी बालाजी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष वसंत जरे, सचिव सचिन वसंत जरे, सदस्या सुवर्णा जरे आदी उपस्थित होते.
