सिद्धिविनायक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली आषाढी वारी 

पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र

आषाढी वारीनिमित्त चिखली, मोरे वस्ती येथील सिद्धिविनायक पब्लिक स्कुलच्या वतीने शनिवारी (दि.१३) पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज या संतांसह वारकऱ्यांच्या वेशभुषा परिधान केल्या होत्या. या सोहळ्यातील बालवारकऱ्यांनी मोरेवस्ती परिसरात ज्ञानोबा-तुकोबांसह हरिनामाचा गजर केला. 

पालखी पूजन व आरती संस्थेचे सचिव मारुती जाधव  व अध्यक्षा निर्मला जाधव यांनी केले. या पालखी सोहळ्यात लेझीम पथकसह टाळ, मृदूंगाचा  अखंड गरज सुरु होता.  विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवल्याचा देखावा सादर केला. विठू नामाचा जयघोष करीत फुगडी खेळत पालखी सोहळ्याचा आनंद घेतला. विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या.

या सोहळ्यामुळे शाळा परिसरात प्रत्यक्षात विठ्ठल रुक्मिणी अवतरल्यासारखे वाटत होते. मोरे वस्ती, टॉवर लाईन, अंगणवाडी चौक, साने चौक, मेहत्रे वस्ती परिसरातून हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. पालखी  मार्नागावर नागरिकांनी बाल वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत व कौतुक केले. सोहळ्यात सर्व  विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व पालक सहभागी झाले.

Share

Leave a Reply