भोसरी ः टीम न्यू महाराष्ट्र
विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा आदर्श आत्मसात करावा. त्यांचे वैचारिक धन वेचून घ्यावे. त्यासाठी महाविद्यालय सतत चांगल्या मार्गदर्शकांचे व्याख्यान आयोजित करते. ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते, असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार विलास लांडे यांनी केले.
भोसरी, लांडेवाडी येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ . पांडुरंग गायकवाड, अनंतराव तांबे, शंकरराव रहाटूळ, डॉ . के. जी. कानडे, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, डॉ. नेहा बोरसे, डॉ. श्रेया दाणी यांच्या हस्ते महात्मा फुले व डाॅ. आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
महात्म्यांचे जीवन हे सर्व समाजाला दिशा दर्शवणारे
प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींची फक्त पूजा न करता त्यांचे कार्यकर्तृत्व काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जयंती साजरी केली जाते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा समजून घेणे गरजेचे आहे. महात्म्यांचे जीवन हे सर्व समाजाला दिशा दर्शवणारे असते. महात्मा फुले यांच्या मागे सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे रमाबाई आंबेडकर होत्या कर्मवीरांच्या मागे लक्ष्मीबाई ठामपणे उभ्या होत्या.बहुजनांसाठी आणि स्त्री शिक्षणासाठी भरीव कामगिरी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा”असा मूलमंत्र दिला. फुले आणि आंबेडकरांनी गुलामगिरी नाकार
प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, विद्यार्थ्यांनी थोर महात्म्यांचे विचार जाणून घेण्यासाठी वाचन करावे. समाजासाठी कार्य करणाऱ्या थोर समाज सुधारकांचे ,थोर महात्म्यांचे व समाजासाठी जगणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरा केल्या जातात.
प्रास्ताविकपर स्वागत करताना डॉ. नेहा बोरसे म्हणाल्या की, आज आपण सहजगत्या शिक्षण घेतो. ते क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या मुळेच. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील बहुजनांसाठी मोठे कार्य केले आहे. महाविद्यालय नेहमी असे उपक्रम राबवित असते.
सांस्कृतिक विभागांतर्गत सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. किरण चव्हाण यांनी केले. डॉ. श्रेया दाणी यांनी आभार मानले. उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, उपप्राचार्य डॉ. नेहा बोरसे, रजिस्ट्रार अश्विनी चव्हाण, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.