विद्यार्थ्यांनो, एकाग्रतेने अभ्यास करून यशाचे शिखर गाठा – कोटकर

भोसरी : टीम न्यू महाराष्ट्र
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात मिळणाऱ्या संसाधनांचा पूर्ण वापर करावा. एकाग्रतेने अभ्यास करून यशाचे शिखर गाठावे असे आवाहन डॉ डी. वाय. पाटील सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड रिसर्च, चिखली संस्थेचे अधक्ष अभय कोटकर यांनी केले.

डॉ. डी. वाय. पाटील सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड रिसर्च, चिखली मध्ये एम बी ए विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभात नवीन विद्यार्थ्यांचा उत्साहवर्धन करणारे विविध कार्यक्रम आणि भाषणांचे आयोजन करण्यात आले. संचालक डॉ. सुनील धनवडे यांनी विद्यार्थ्यांना नवनवीन ज्ञान मिळवण्याच्या महत्त्वाचया सूचना केल्या. महाविद्यालयाच्या मूल्यांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले. त्यांनी शैक्षणिक आणि व्यावसायिक संधींची माहिती दिली. सिंटेल कंपनीचे
प्रमुख मनुष्यबळ अधिकारी सुधीर मतेती यांनी नियोजनाचे महत्त्व पटवून सांगितले. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर नियोजन कसे असावे याचे सूत्र सांगितले. बिजनेस स्टॅंडर्डचे व्यवस्थापक सुमेध गुप्ते यांनी कॉलेजमधील विविध विकासात्मक कार्याची माहिती सांगितली . तसेच मंजिरी कुलकर्णी ,मनीषा खोमणे ,जितेंद्र पेंडसे, अमरेंद्र चितळे यांनीही मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन निलेश राजे यांनी केले.

Share

Leave a Reply