सुर्यकुमारच्या निर्णायक झेलने टीम इंडियाचा टि-२० विश्वचषकाच्या विजयाचा दुष्काळ संपला

मुंबई ः  टीम न्यू महाराष्ट्र

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत आयसीसीच्या टी २०  वर्ल्ड कप 2024 ला गवसणी घातली.  टीम इंडियाने २००७  साली दक्षिण आफ्रिकेत झालेला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर १७ वर्ष भारताला या स्पर्धेच्या विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. मात्र, रोहित शर्माच्या नेतृतवाखील  टीम इंडियाने १७ वर्षांनंतर विजतेपद पटकावले.

टीम इंडियाला शेवटच्या २० व्या षटकात वर्ल्ड कप जिंकण्यासाठी १६ धावा रोखायच्या होत्या.  दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबंद फलंदाज डेव्हिड मिलर मैदानात होता. त्यामुळे सामना आफ्रिकेच्या बाजूने झुकला होता. हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात अचूक गोलंदाजी करत फक्त ८ धावा दिल्या.   पहिल्याच चेंडूवर त्याने डेव्हिड मिलरला माघारी धाडले. या बळीचे सर्व श्रेय हे सूर्यकुमार यादवचे होते. त्याने सीमारेषेवर जबरदस्त क्षेत्ररक्षण करीत  मिलरचा झेल  पकडला. सूर्याने हा झेल पकडल्यामुळेच टीम इंडियाने विजजेतेपदाला आणि टी -२० विश्वचषकाला गवसणी घातली.

हार्दिक शेवटचे षटक टाकायला आला त्यावेळी डेव्हिड मिलर स्ट्राईकवर होता. टीम इंडिया आणि टी २० विश्वचषकात मिलर हा मोठा अडथळा होता.  हार्दिकने ऑफ स्टम्पच्या बाहेर लो फुल टॉस बॉल टाकला. मिलरने तो  लाँग ऑफच्या दिशेने टोलावला. मिलरचा फटका सीमा रेषेबाहेर जाणार असे दिसत असतानाच  सूर्यकुमार यादवने सीमा रेषेवर जबरदस्त झेल पकडला.  हा झेल घेताना त्याचे संतुलन बिघडले होते. प्रसंगावधान राखून त्याने झेल उंच फेकून पुन्हा मैदानत झेल टिपला. टीम इंडियाच्या विजयासाठी हा झेल अतिशय निर्णायक ठरला.

Share

Leave a Reply