देहूरोड : टीम न्यू महाराष्ट्र
सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेचा देहूरोड शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदविला. या पुतळा उभारणीचे काम निष्कृष्ट दर्जाचे केले असून या कामात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप आंदोलकांनी या वेळी केला.
देहूरोड शहर महाविकास आघाडीच्या वतीने देहूरोड बाजारपेठ येथील शिवस्मारक या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष महेश केदारी यांच्या हस्ते, तर शिवसेना मावळ तालुका संघटक रमेश जाधव यांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी राज्य सरकारचा निषेध केला. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळा उभारण्यात आला. भ्रष्ट कारभारामुळे हा पुतळा कोसळला. याप्रकरणी संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी या वेळी शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष मिकी कोचर, काँग्रेसचे शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमत्तू , गोपाळ तंतरपाळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका समन्वयक रमेश जाधव, शहरप्रमुख भरत नायडू, युवा सेना मावळ तालुका सचिव विशाल दांगट पाटील, पांडुरंग बालघरे, विभागप्रमुख विजय थोरी, मेहेरबान सिंग तक्की, राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास गोरवे, सुरेश भारस्कर, रफिक शेख, शिवाजी दाभोळे, अलिम मुल्ला, आरिफ आतार, राहुल रायकर, रेणू रेड्डी, बाॅबी डिका, हुसेन पिंजारी, समीर सतेलु, आकाश कानपुरम, गोविंद राऊत, राजेश कदम, प्रकाश झुटके, मेहबूब आतानी, अँथोनी स्वामी , केशव पिल्ले, दीपक कसबे, कादर शेख, गफूर शेख , मेहबूब गोलंदाज, व्यंकटेश कोळी, बबन टोम्पे, भरतराज मारीमुत्तू आदी उपस्थित होते.