समाजाच्या विविध स्तरातून मागणी
मुंबई ः टीम न्यू महाराष्ट्र
महाराष्ट्रात निरपेक्ष भावनेने लाखो नागरिकांसाठी आरोग्यदूत म्हणून ख्याती मिळविलेल्या तसेच आरोग्य सेवेबाबत पक्षीय भेदभाव न करता मदत करणाऱ्या मंगेश चिवटे यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर काम करण्याची संधी देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. विविध राजकीय पक्षांच्या वैद्यकीय सहायता कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही मंगेश चिवटे यांनी विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
मंगेश चिवटे यांचे आरोग्य क्षेत्रातील महत्वाचे कार्य
१) शिवसेना खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मागील ८ वर्ष अखंड रुग्णसेवेचं कार्य.
२) आज संपूर्ण राज्यात खेडोपाडी ८००० निःस्वार्थ रुग्णसेवकांची फौज तयार करण्यात चिवटे यशस्वी.
३) राज्यातील ३६ जिल्ह्यांसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची अधिकृत कार्यालये जनसेवेसाठी सदैव सक्रीय आहेत.
४) २५,००० गोरगरीब रुग्णांच्या शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात किंवा पूर्णपणे मोफत करवून देण्यात चिवटेंना यश आले आहे.
५) रुग्णवाहिका चालक/मालक, रक्तपेढ्या चालक, डायलिसिस सेंटर चालक, पॅरामेडिकल अर्थात् नर्सिंग स्टाफ, लॅब टेक्निशियन्स, रेडिओ टेक्निशियन्स, वैद्यकीय जिक कार्यकर्ते, आशा वर्कर्स अशा आरोग्यविषयक सर्व घटकांचे मजबूत संघटन आज चिवटेंच्या पाठीशी आहे.
६) मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी या कक्षाच्या संधीचे मंगेश चिवटेंनी सोनं केलं आहे. ही योजना सुलभ करत व्यापक करण्याचे श्रेय त्यांनाच जाते.
७) सत्तापरिवर्तनानंतर चिवटे यांच्या प्रयत्नातून ४० हजार गंभीर रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ३२१ कोर्टींपेक्षा अधिक रक्कम वितरीत करण्यात आली आहे.
८) आजही मंगेश चिवटे कसलीही अपेक्षा न ठेवता आरोग्य शिबिरांच्या, संवाद मेळाव्याच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत त्यांचे दैनंदिन प्रश्न समजावून घेत सोडवण्यासाठी यशस्वी प्रयत्र करत आहे.
९) या व्यतिरीक्त चिवटेंचा पत्रकारितेचा अनुभव व माणसे जोडण्याची कला सर्वपरिचित आहे.
या सर्व बाबींचा विचार करुन मंगेश मंदाकिनी नरसिंह चिवटे यांना राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर संधी देवून राज्यातील रुग्णसेवकांना हक्काचा आमदार द्यावा, अशी मागणी समजाच्या विविध स्तरातून करण्यात येत आहे.
मंगशे चिवटे यांचे आरोग्य व रुग्णसेवेतील सर्वांना माहित आहे. नव्हे महाराष्ट्राचा आरोग्यदूत अशीच त्यांची ओळख आहे. चिवटे यांच्यापासून प्रेरणा घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात आरोग्यदूत कार्यरत झाले आहेत. आरोग्यसेवा, रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी पक्षीय भेदभाव न पाळता ते कार्यरत असतात. त्यामुळे अशा निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या आरोग्य दूताला विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्त करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या केली आहे.
जितेंद्र सातव ः प्रदेशाध्यक्ष, वैद्यकीय सहायता कक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस.