देहूरोड ः टीम न्यू महाराष्ट्र
विकासनगर, किवळे येथील साउथ इंडियन असोसिएशनच्या सेठ एच. ए. बरलोटा मेमोरियल विस्डम इंग्लिश मिडीयम हायस्कूल या शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी शाळेतील सर्व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या वेळी प्रमुख पाहुणे भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीजच्या संस्कृत विषय तज्ञ डॉ. वीणा राज, असोसिएशनचे पेट्रान तुकाराम भोंडवे, शाळेचे अध्यक्ष जयशंकर जयसिंग, संस्थेच्या
महासचिव पार्वती बाबू, खजिनदार जेकब नाडार, शाळेचे सचिव ए. के. प्रेमचंद्रन, शाळेचे खजिनदार के. के. पिल्ले आदींसह संस्थेचे सदस्य एस. डेव्हिड नाडार, जोगिंदर भाटिया, दिलीपकुमार नायर, व्यंकटेश ओलारी व टि. क्रिस्टोपर, मुख्याध्यापिका गायत्री धामणेकर व सह मुख्याध्यापिका शेरीन कुरियन आदी उपस्थित होते.
शाळेचे अध्यक्ष जयशंकर जयसिंग आणि सर्व संस्था संचालकांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी प्रमुख पाहुण्या वीना राज यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे व गुरुचे महत्त्व सांगितले.