मॉडर्न हायस्कुलच्या शिक्षकांनी घेतली मतदान करण्याची शपथ

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कुल निगडी येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मतदान करण्याची शपथ घेतली.पुढील महिन्यात 13 मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.या निवडणुकीत निर्भीडपणे,नि:पक्षपातीपणे तसेच कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करून लोकशाही अधिक बळकट करण्याचा संकल्प करण्यात आला.

यावेळी मतदान नोंदणी अधिकारी शिवाजी अंबिके यांनी सर्व शिक्षकांना जागरूकपणे मतदान करण्याची शपथ दिली.मतदान नोंदणी अधिकारी मनीषा बोत्रे,जयश्री चव्हाण,साधना राऊत,कविता गायकवाड,अर्चना सुरवसे यांनी पुढाकार घेतला. उपजिल्हाधिकारी तथा भोसरी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे ,नायब तहसीलदार अपर्णा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह डॉ.ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे,शाळा समिती अध्यक्ष मानसिंग साळुंके,मुख्याध्यापिका शारदा साबळे,पर्यवेक्षिका वर्षा पाचारणे यांनी केले. ‎

Share

Leave a Reply