भोसरी ः टीम न्यू महाराष्ट्र
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या चऱ्होली येथील श्री वाघेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या सन २००४-२००५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. या वेळी उपस्थित माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच तत्कालीन शिक्षकांनी शालेय जिवनातील आठवणींना उजाळा दिला.
तब्बल २० वर्षांनी शालेय सवंगडी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते. काहींनी आपल्या वर्ग मित्रांना ओळखले, तर काहींना ओळखणे अवघड झाल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे प्रत्येकाने आपली ओळख करुन दिली. त्यानंतर शालेय जीवनातील आठवणी जागविण्यात आल्या. जुन्या आठवणी सांगताना काहींना गहिवरुन आले होते. अनेक दिवसांनी एकत्र आलेल्या सवंगड्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान ओसंडून वाहतना पाहायला मिळाले.
या मेळाव्यात तत्कालीन शिक्षकांच्या वतीने के. जी. शिवले, एस. एस.वाल्हेकर, रेखा साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. तर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने नवनाथ रसाळ, समाधान गावडे, विशाल तापकीर, पुनम तापकीर, स्मिता तापकीर यानी आपल्या भावना व्यक्त करीत शालेय जीवनातील गमती जमतीसह जुन्या आठवणी जागविल्या.
विशाल जयसिंग तापकीर, युवराज तापकीर, विजय तापकीर, सचिन कोतवाल, समीर तापकीर, सागर सोनवणे, दत्ता कुंभार, उमेश नांद्रे, उमेश तापकीर, सागर चव्हाण, अभिजीत तापकीर, आरती रासकर, हेमलता तापकीर, दीपांजली भाडळे, प्रतिमा तापकीर, नीलम तापकीर, प्राची तापकीर, सुनिता रसाळ, सारिका कोतवाल, स्मिता पठारे, सारिका तापकीर आदींनी मेळाव्याचे संयोजन केले.