नटेश्वरा अंतर्गत उलगडला संगीत नाटकांचा प्रवास…

सासवडच्या पुरंदरे वाड्यात आषाढ्स्य प्रथम दिवसेला प्रतिसाद

सासवड ः टीम न्यू महाराष्ट्र

शाकुंतल, स्वयंवर, शारदा, राज संन्यास मत्स्यगंधा, ययाती देवयानी एकच प्याला , कट्यार काळजात घुसली, रणदुधुंभी, साष्टांग नमस्कार अशा विविध संगीत नाटकांचा सुंदर प्रवास कथन करत सासवड येथे रसिकांना मंत्रमुग्ध केले.

निमित्त होते, दरवर्षी प्रमाणे कवी कालिदास दिन अर्थात आषाढस्य प्रथम दिवसे या पुरंदरे कुटुंबियांच्या कार्यक्रमाचे..आणि हा सुंदर नाट्य प्रवास कथन केला होता प्रसिद्ध निवेदक, नाट्य कलाकार संजय गोसावी आणि त्यांच्या पत्नी लेखिका मृणाल गोसावी यांनी. गेली पन्नास वर्षे अव्याहत सुरु असलेला हा उपक्रम पुरंदरे वाड्यात नेहमी प्रमाणे सासवडकर रसिकांच्या प्रतिसादात चांगलाच रंगला.

संगीत शाकुंतल मधील”पंचतुंड नररुंड मालधर” या नांदीने कार्यक्रमाचां प्रारंभ झाला. गोसावी दांपत्याने या प्रसंगी विविध संगीत नाटकांचा प्रवास कथन करत प्रसंगी त्यातील पात्रांचे स्वगत, नाट्यगीते सादर करुन उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. अण्णासाहेब किर्लोस्कर गडकरी, खाडिलकर, देवल, दारव्हेकर, ते आचार्य अत्रे यांच्या नाट्य कृतींचा यात समावेश होता. राज संन्यास मधील संभाजी राजेंच्या स्वगताला रसिकांनी भरभरून दाद दिली. ययाती देवयानी मधील “सर्वात्मका सर्वेश्वरा”या पदाने कार्यक्रमाची सांगता झाली.

पुरंदरे कुटुंबियातील गीता पुरंदरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर कौशिक पुरंदरे ,प्रतिभा पुरंदरे यांनी सर्वांचे स्वागत केले. वर्षा बालगोपालन व ॲड. अण्णासाहेब खाडे यांनी प्रास्तविक केले.

कार्यक्रमास ॲड. दिलीप निरगुडे, हेमंतशेठ भोंगळे, विजय कोलते, शाम महाजन, डॉ. दिलीप वाघोलीकर, डॉ. संजय रावळ, प्रा. नारायण टाक, डॉ. विनायक खाडे, प्रदिप पोमण, मंजुषा निरगुडे, कांचन तळेकर, इंदिरा पवार, वसंत ताकवले, अनिल कदम, कलाताई फडतरे, शशिकला कोलते, डॉ. घनशाम खांडेकर, डॉ. मनिषा खाडे, कल्पना नागनुर, किरण पुरंदरे, प्रदीप कुलकर्णी, श्रीकांत कांबळे, किरण हेंद्रे , नंदकुमार ब्रम्हे, चंद्रसेना मुरकुटे, एस के देशपांडे सर, संदिप इनामके, अमोल बागडे, तानाजी सातव, डॉ. ऋता खांडेकर, आप्पासाहेब पुरंदरे यांसह मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.

Leave a Reply