विद्यार्थ्यांकडून ‘जय जवान जय किसान’चा नारा

पिंपरी: टीम न्यू महाराष्ट्र

मास्टर माइंड ग्लोबल स्कूल व कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळा ‘जय जवान जय किसान’ या थीमनुसार सजवण्यात आली होती. प्रमुख पाहुण्या शाळेच्या संस्थापिका जयश्री गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मनीकंदन नायर, मुख्याध्यापिका डॉ.प्रदीपा नायर, नायब सुभेदार दिलीप गुरव, संतोष चव्हाण, शिक्षक , पालक व विद्यार्थी उपस्थित होते. ‘ जय जवान जय किसान’ थीम ठेवून संपूर्ण शाळेची सजावट करण्यात आली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, नाटक , कसरतीचे खेळ, मुकनाट्य , समूहगीत सादर करत बदलत्या भारताचे दर्शन घडविले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले . मुख्याध्यापिका व प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास , जीवनातील शिस्तीचे महत्व, मैदानी खेळ यांचे मार्गदर्शन केले. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share

Leave a Reply