चार पिस्टल व सहा काडतुसांसह तळेगाव दाभाडे परिसरातून तिघांना अटक

मावळ : टीम न्यू महाराष्ट्र

दोन वेगवेगळ्या कारवाई मध्ये तळेगाव दाभाडे परिसरातून तिघांना चार पिस्टल व सहा जिवंत काडतुसासह अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथक यांनी शनिवारी (दि.22)जुना पुणे मुंबई महामार्ग तसेच तपोधाम कॉलनी येथे केली आहे.

ओमकार उर्फ बंटी दत्ता आसवले (वय 20 रा टाकवे मावळ) , समर्थ संभाजी तोरणे (वय 19 रा कात्रज) व अमन मेहबूब शेख (वय 19 रा कोंढवा) अशी अटक आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुंडाविरोधी पथकाचे पोलीस शिपाई शुभम तानाजी कदम व रामदास कुंडलिक मोहिते यांनी फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओमकार हा जुना पुणे मुंबई महामार्ग येथील निलया सोसायटी समोर थांबला होता पोलिसांना याची माहिती मिळतात पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून एक लोखंडी पिस्तूल व दोन जिवंत काढत असे एकूण 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तर दुसरी कारवाई गुंडाविरोधी पथकाने तपोधाम कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळ केली यावेळी पोलिसांनी समर्थ व अमन या दोघांना अटक केली त्यांच्याकडून पोलिसांना तीन देशी बनावटीचे पिस्तुले व चार जिवंत काढतो असा एकूण 1 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळाला तीनही आरोपींवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसापुर्वी झालेला गोळीबार व त्यानंतर सापडली ही शस्त्र यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

Share

Leave a Reply