महान गायक के ए सेहगल यांना स्वरांजलीतून मानवंदना

पुणे : टीम न्यू महाराष्ट्र 

स्वर साधना करा ओके सिंगिंग स्टुडिओ यांच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे महान गायक के एल सेहगल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी सेहगल यांची गाजलेली गिते सादर करुन त्यांना स्वरांजली अर्पण करण्यात आली.

स्वर साधना स्टुडिओचे मालक उदय काळे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाला किशोर पंड्या यांच्यासह अन्य गायकांनी सेहगल यांची अनेक गीते सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढविली. हा एक बंगला बने न्यारा, मेरे हथील शाम, दिल को है तुमसे, जब दिल ही टूट गया, चले पवन की चाल… अशी अनेक गीते सादर करण्यात आली.

तसेच या कार्यक्रमात  चिंतामणी खाडे यांनी उत्कृष्ट निवेदन केले. ध्वनी व्यवस्था अतुल परांजपे यांनी तर फोटोग्राफर नागेश झळकी, व्हिडिओ विक्रम क्रिएशन व व्यवस्थापन मंदार बापट यांनी आपआपली जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली.  या आगळ्यावेगळ्या व हटके कार्यक्रमाला पुणेकरांनी भरभरुन  दाद दिली.  या वेळी आवर्जुन उपस्थित असलेल्या गायक सेहगल यांच्या ज्येष्ठ चाहत्यांनी सेहगल यांच्या आठवणी जागविल्या.

Share

Leave a Reply