भोसरी ः टीम न्यू महाराष्ट्र
इंद्रायणी युवा प्रतिष्ठान व तुषार सहाणे युवा मंच यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ८ मधील इयत्ता १० वी व १२वीमध्ये ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या सत्कार समारंभासह करियर मार्गदर्शन सोहळ्याला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भोसरी, इंद्रायणीनगर येथील कै. भिवाजी सहाणे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी मोशन अकॅडमीचे संचालक प्रा. संदीप पवार यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील करियर संधी आणि प्रवेश प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन केले. तर मुंबई आयआयटीचेप्रा. जितेंद्र पवन यांनी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील करियर संधी आणि प्रवेश प्रक्रिया तसेच स्पर्धा परीक्षा या विषयावरप्रा. डॉ. कैलास सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी रूपेश पारुळेकर, सदाशिव ( बापू) आगळे, प्रकाश सहाणे, रघुनाथ हांडे, विठ्ठल (नाना) वाळूंज, भास्कर दातीर, अजिंक्य पोटे, विनोद जाधव, विश्वनाथ टेमगिरे, सुरज झांजूर्णे, स्वप्नील ओव्हाळ आदी उपस्थित होते.
या मेळाव्यात विद्यार्थ्यांना करियरच्या विविध संधिबद्दल मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्याचे महत्व उलगडून सांगण्यात आले. पोलिस प्रशासन उद्योग आणि इतर क्षेत्रात कामगिरी केलेल्या अनुभवांचे दाखले देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली गेली.
एकूण २९० विद्यार्थ्यांचा सन्मान
प्रभागतील इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक मिळविलेल्या वेदांत प्रकाश खैरनार व संची मंगेश घोलप, द्वितीय क्रमांकासाठी सार्थक आदिनाथ नामदे व प्राजक्ता पांडुरंग देशमुख, तृतीय क्रमांकासाठी स्वरा सचिन रासकर, उदयसिंह फडतरे व गौरी हणमंत पवार त्याचबरोबर इयत्ता बारावीत प्रथम क्रमांक मिळविलेल्या कौशल अशोक टोपे, द्वितीय क्रमांकासाठी वैभव काळे व सुमन मोनदल, तृतीय क्रमांकासाठी रेचल वैभव लकारे यांच्यासह एकूण २९० गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
