टीम न्यू महाराष्ट्र – पिंपरी, प्रतिनिधी
रावेत येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक मधुकर भोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य फुलपिच टेनिस बाल क्रिकेट स्पर्धा आणि मोफत आयोग्य तपासणी शिबिरा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भोंडवे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला.
दिपक भोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त रावेतमध्ये पहिल्यांदा भव्य फुलपीच टेनिस बॉल लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. एकूण २२ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन तसेच बक्षीस वितरण चिंचवडचे आमदार शंकर पांडुरंग जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विजेत्या संघाना रोख रक्कम आणिसन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महापावलिकेचे मजी गटनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक सचिन चिंचवडे, भाजप रावेत काळेवाडी मंडळ अध्यक्ष सोमनाथ भोंडवे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
क्रिकेट स्पर्धेत नम्रता ग्लोरीयाला विजेतेपद
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नम्रता गलोरिया हाऊसिंग सोसायटी यांनी पटकावला, द्वितीय क्रमांक एक्वामरीना हाउसिंग सोसायटी, तृतीय क्रमांक सिल्वर लँड फेज एक, तर चौथा क्रमांक सेरेनिटी स्पार्टंट या संघाने पटकावला. स्पर्धेचा मालिकावीर आणि बेस्ट बॅट्समन पुरस्कार नम्रता गुलोरियाचे प्रणील मिस्त्री यांना तसेच बेस्ट बॉलरचा मान कुशल खोडके (एक्वा मरीना) यांना मिळाला.
महिलांमध्ये कोमल सैनी ठरल्या उत्कृष्ट खेळाडू
त्याचप्रमाणे महिलांच्या सामन्यांमध्ये कोमल सैनी ( सिल्वर गार्नियर) यांनी उत्तम कामगिरी करत महिला उत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला. या स्पर्धेच्या नियोजनासाठी श्री दिपक मधुकर भोंडवे मित्रपरिवारातील संतोष भोंडवे, सुनील भोंडवे, अजय भोंडवे, आणि वैभव देशमुख ( जी के सिल्वरलँड फेस तीन) यांच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली.
श्री दिपक मधुकर बोंडवे यांचा अभिष्टचिंतन सोहळा रावेत येथील समीर लॉस येथे पार पडला. यावेळी रावेत, किवळे, विकास नगर, मामुर्डी तसेच पिंपरी चिंचवडसह मावळ, मुळशी परिसरातील मान्यवरांनी भोंडवे यांना शुभेच्छा देण्याकरिता मोठी गर्दी केली होती. चिंचवड विधानसभाचे आमदार शंकर पांडुरंग जगताप, माजी गटनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक सचिन चिंचवडे, रावेत काळेवाडी मंडळ अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, पोपटशेठ भोंडवे, रावेत किवळे गावातली ज्येष्ठ मंडळी, सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित होते. शंकर जगताप यांनी केक भरूऊन दिपक भोंडवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
श्री संत तुकाराम साखर कारखाना कासरसाई यांचे संचालक मधुकर नथू भोंडवे यांनी आमदार जगताप यांचा सत्कार केला. या वेळी मनोरंजनासाठी ही रंग हे सप्तसुरांचे नामक बहारदार मराठी हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते निवृत्त मुख्याध्यापक श्री शेंडे सर आणि ॲड. प्रीती सिंग परदेसी यांनी दिपक भोंडवे यांच्या कार्याची दिली.
आरोग्य शिबिराला ज्येष्ठांचा प्रतिसाद
त्याचप्रमाणे दिपक भोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रभागा कॉर्नर जेष्ठ नागरिक संघ आणि निदान पॅथॉलॉजी लॅब यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत रक्त व नेत्र तपासणी शिबिर भरवण्यात आले होते. या शिबिराला उंदड प्रतिसाद मिळाला. यामध्ये ज्येष्ठांनी लक्षणीय उपस्थिती होती.