खोट्या गॅरंटीच्या भुलथापांना मतदार बळी पडणार नाहीत – संजोग वाघेरे

मावळ : टीम न्यू महाराष्ट्र

ज्यांना तुम्ही दहा वर्षे संसदेत काम करण्याची संधी दिली. त्यांनी सर्वसामान्य मतदारांनी टाकलेला‌ विश्वास सार्थ ठरविण्यासाठी काम करणं गरजेचं होतं. पण, त्यांनी मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केले. असंख्य ‌गावांमधील पाण्याचा प्रश्न देखील त्यांना सोडवता‌ आला नाही. ते आता पुन्हा गॅरंटीच्या नावाखाली फक्त आश्वासने द्यायला येतील. परंतु, त्यांच्या या खोट्या गॅरंटीच्या भुलथापांना मतदार बळी पडणार नाहीत, असे मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे व इंडिया फ्रंटचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी म्हटले.

संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे इंडिया फ्रंटचा संयुक्त मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याप्रसंगी कर्जत खालापूर विधानसभा उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार) जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे, गोपाळ शेळके, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका सरचिटणीस रामशेठ राणे, कॉंग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संजय गवळी, तालुका अध्यक्ष शंकर भुसारी, शिवसेनेचे तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य दिनानाथ देशमुख उपस्थित होते.

संजोग वाघेरे म्हणाले की, कित्येक वर्षांपासून आम्ही पिंपरी चिंचवड शहरात सामाजिक आणि राजकीय काम करताना विचार‌ करत होतो की, मावळच्या मतदारांनी निवडून दिलेला माणूस चांगला काय करत असावा. परंतु, दहा वर्षांत त्यांनी काम केले नाही. हे मतदारसंघातील आमच्या महिला भगिनींना पाण्यासाठी दोन-तीन किलोमीटर जावे लागत असल्याचे पाहिल्यानंतर लक्षात येते. अत्यंत जिवाळ्याचा शश म्हणजे पाणी हा जलजीवनाचा प्रश्न सोडविता का आलेला नाही‌, असा‌ सवाल‌‌ करत वाघेरे पाटील यांनी टीका केली. मतदारसंघात काहि ग्रामीण भागात पाणी प्रश्न सोडवून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी आपण काम करु, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

Share

Leave a Reply