महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे बाळासाहेब ओव्हाळ यांची पिंपरी मतदार संघात प्रचारात आघाडी

पिंपरी : (प्रतिनिधी)

पिंपरी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अर्थात परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार बाळासाहेब नामदेव ओव्हाळ यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. मतदार संघातील दापोडी परिसरातील घरोघरी संपर्क साधून आणि तेथील मतदारांशी संवाद साधून बाळासाहेब ओव्हाळ हे घरोघरी पोहोचण्यात यशस्वी होत आहेत. पहिल्या टप्प्यातील प्रचारात तर त्यांनी मुसंडी मारली आहे. ओव्हाळ यांचे कार्यकर्ते पिंपरी मतदार संघात प्रत्यक्ष संपर्काद्वारे किंवा पदयात्रेद्वारे अनेक ठिकाणी पोहोचले आहेत. त्यामुळे पिंपरी विधानसभे मधून त्यांचा विजय हा प्रचंड मताधिक्याने होईल असे सांगण्यात येत आहे . ‘आरंभ है प्रचंड’ असे म्हणतच त्यांचे अनेक कार्यकर्ते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.—-

 

प्रतिष्ठित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या गाठीभेटी

बाळासाहेब ओव्हाळ यांचा पदयात्रांचा किंवा प्रचाराचा महत्वाचा सूर असा राहिला कि फिरताना , बोलताना झोपडपट्टी धारकांच्या समस्या समजावून घेणे आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन गरजेच्या आवश्यक सुविधा कशाप्रकारे उपलब्ध करून देता येतील, यावर त्यांनी भर दिला आहे.समस्या सुटाव्यात यासाठी नागरिकांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार ते व्यक्त करताना दिसत आहेत. नागरिकांशी संवाद साधत असतानाच या परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांना भेटून चर्चा करण्यावर त्यांनी भर दिला आहे. प्रचाराच्या या पहिल्या टप्प्यात त्यांनी दापोडी गावठाण, काचीवाडा, कणसेवाडा, गणेश आंगण बाॅम्बे काॅलनी, गणेशनगर दापोडी या परिसरातील सोसायट्यां आणि विविध कॉलनीतील घरांना त्यांनी भेट देण्यासाठी जोमात सुरुवात केली आहे.
—–
मतदार संघात मागील सात महिन्यापासून संवाद यात्रा

पिंपरी विधानसभा मतदार संघातून बाळासाहेब ओव्हाळ यांनी मागील सात महिन्यापासून संवाद यात्रा सुरू असल्याने त्यांना प्रचारासाठी भरपूर वेळ मिळाला आहे. याउलट विरोधकांतर्फे कोण, हा घोळ आणि चर्चेचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत सुरूच होते. उमेदवार शोधणे, त्याला सक्रिय करणे ही विरोधकांची मोठी मोहीम ठळकपणे दिसून आली. बाळासाहेब ओव्हाळ यांच्या प्रचाराचे सूत्र आधीच निश्चित झाले होते आणि त्यानुरूप प्रचाराला सुरुवातही झाली आहे.महाराष्ट्र स्वराज्य पक्ष,प्रहार संघटना,स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे कार्यकर्ते, झटून कामाला लागले असून अतिशय सूक्ष्म नियोजन, प्रत्येक दिवसाचे कार्यक्रम यांची आखणी झाली आहे. त्याप्रमाणे गाठीभेटींवर भर देण्यात आला आहे.
—–
बाळासाहेब ओव्हाळ यांचा पिंपरी पॅटर्न
बाळासाहेब ओव्हाळ यांच्याबद्दल पिंपरी मतदारसंघात अतिशय आपुलकी असून २४ तास उपलब्ध असणारा आमदार आम्हाला हवा आहे, असे मत पिंपरीकर व्यक्त करताना दिसतात. पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक असताना बाळासाहेब ओव्हाळ नागरिकांसाठी केव्हाही उपलब्ध असल्याची भावना, त्याचप्रमाणे संकटकाळी धावून जाणारा आमचा नेता असल्याचे अनेक जण बोलून दाखवतात. सुशिक्षित, उच्चभ्रू त्याचप्रमाणे काही गोरगरीब जनतेचा बनलेला हा मतदारसंघ असून या निवडणुकीत विजय मिळवायचाच असल्यामुळे त्यांचे स्वागत ‘आपल्या घरातील उमेदवार’ असल्यासारखे सर्वत्र होत आहे, हाच त्यांचा ‘पिंपरी पॅटर्न’ त्यांना विजयश्रीकडे घेऊन जाणार असल्याची भावना मतदार बोलून दाखवत आहेत.
—–
नागरिकांना बाळासाहेब ओव्हाळ यांच्या बद्दल आदर
सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच या परिसरातील व्यापारी, उद्योगपती, खेळाडू, महिला, युवाशक्ती यांच्याशी सतत संपर्कात राहणाऱ्या बाळासाहेब ओव्हाळ यांचा आदर आहेच. पण वृद्ध नागरिकांसाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी व्यक्त केलेले विचार आणि त्याप्रमाणे नियोजित केलेल्या योजनादेखील नागरिक उत्साहाने आणि आपलेपणाने बोलून दाखवत आहेत. अर्ज भरल्यानंतर लागलीच बाळासाहेब ओव्हाळ यांनी पिंपरी परिसरातील गाठीभेटींमध्ये प्रामुख्याने इतर राजकीय पक्षातील पक्षांतर्गत असंतुष्टांच्या भेटी, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अध्यात्मिक संस्था, प्रख्यात व्यावसायिक, कलाक्षेत्रातील दिग्गज यांच्याशी संपर्क साधला आणि सर्वत्र त्यांचे आपुलकीने स्वागत झाले. पिंपरी मतदार संघामध्ये मध्ये एकूणच दांडगा व्यासंग त्यांना नक्कीच यशस्वी करून जाणार असल्याचे बोललं जात आहे.
संवाद दौऱ्यामध्ये बाळासाहेब ओव्हाळ यांच्या समवेत निशा ओव्हाळ, गौतम गायकवाड, विनोद कांबळे,
सचिन सकाटे,मालन गायकवाड,संगिता कुंवर, प्रियांका शिंदे, अनिरुद्ध भागवत,अनुजा जाधव, रेखाताई, उत्तम पांढरे, सतिश राठोड,करण कणसे, संजय गायकवाड,आदी कार्यकर्त्यांसह अनेक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply