रायगडाच्या महादरवाजात धबधबा; पर्यटकांची सुखरुप सुटका

मुंबई  ः  टीम न्यू महाराष्ट्र 

 दोन दिवसांपासून  कोकणात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. अनेक भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहेत. अशातच  किल्ले रायगडावर ढगफुटीसदृष्य पाऊस पडल्याने महादरवाजातून धबधबे वाहत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

रायगडावर अति मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गडावर गेलेले काही  पर्यटक महादरवाजाजवळ  अडकून पडले. रविवारी रात्री उशीरा त्यांची सुटका करण्यात आली.  रायगडावर झालेल्या ढगफुटीसदृष्य पावसामुळे महादरवाज्यातून धबधबे वाहू लागले होते.    यामुळे गडावर गेलेले  पर्यटक तेथे अडकून पडले होते.

पहिल्यांदाच अशा प्रकारे धबधबासदृश्य पाणी रायगडाच्या महादरवाज्यातून कोसळत असल्याचे पहायला मिळाले. धबधब्यांचे दृष्य पाहून पर्यटकांची पाचावर धारण बसली.  अखेर प्रशासनाच्या मदतीने गडावर अडकलेल्या पर्यटकांची सुखरुप सुटका करण्यात आली.

Share

Leave a Reply