विधानसभेला मविआ एकत्र लढणार की स्वतंत्र?; संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण

मुंबई : टीम न्यू महाराष्ट्र

लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. त्यानंतर आता महाराष्ट्रात आता लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना हे तीन पक्ष या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार की स्वतंत्रपणे लढणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलंय. संजय राऊतांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. विधानसभेला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष एकत्र निवडणूक लढणार की स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरं जाणार? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. तेव्हा विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढू आणि महाराष्ट्रात सत्ता मिळवू. त्यासाठी स्थानिक स्तरावर संघटन मजबूत असणं गरजेचं आहे. त्याचबाबत आजच्या बैठकीत आम्ही चर्चा केली. एखादी विधानसभा आपण लढू अथवा न लढू. पण तिथं संघटनात्मक बांधणी मजबूत झाली पाहिजे. त्यासाठी कामाला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिल्या आहेत. 180-185 जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

भाजपला बहुमतापासून रोखण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. महाविकास आघाडीचा मोठा वाटा आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, मुंबईचे विभाग प्रमुख यांची बैठक झाली. या बैठकीत संघटनात्मक बांधणीवर जोर देण्यास सांगण्यात आलं आहे. तशी चर्चा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झाली, असं संजय राऊत म्हणाले. भाजप रोखण्यात महावीकास आघाडीचे योगदान जास्त आहे. संघटनात्मक बांधणीवर आम्ही जोर दिला आहे. स्थानिक मतदारसंघातील निवडणुका आहेत त्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. 288 मतदारसंघाची बांधणी करण्याचे आदेश जिल्हाप्रमुखांना दिल्या आहेत. आम्ही महिविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे निवडणुका लढवणार आहोत. उद्धव ठाकरेंच्या विधानसभेच्या पुर्वतयारीसाठी ईनडोर सभांचं आयोजन करण्यात आलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

Share

Leave a Reply