पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र
विकासनगर, देहूरोड येथील साऊथ इंडियन असोसिएशन्सच्या शेठ एच. ए. बरलोटा मेमोरियल विस्डम इंग्लिश मिडीयम स्कुलच्या वतीने शाळेच्या प्रांगणात जागतिक महिला दिन मोठ्या हर्षोल्लात पार पडला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार उमा खापरे व देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे उपस्थित होते. या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रख्यात वकील पूनम शिंदे व अनुराधा बोधे, डॉ. सुमती सुनील, शाळेच्या पूर्व प्राथमिकच्या शिक्षिका गौरी देवरे, कुंदा मोरे व महिला पोलीस कर्मचारी मनीषा पोले आदींचा समावेश होता.
संस्थेचे आधारस्तंभ तुकाराम भोंडवे, संस्थेचे व शाळेचे अध्यक्ष जयशंकर जयसिंग, संस्थेच्या महासचिव पार्वती बाबू, खजिनदार जेकब नाडार, उपाध्यक्ष वेंकटाचलापती, के. के. पिल्ले, मुख्याध्यापिका गायत्री धामणेकर, सहमुख्याध्यापिका शेरीन कुरियन, विश्वस्त ए. के. प्रेमचंद्रन नायर, दिलीप कुमार नायर, राकेश नायर, धर्मपाल तंतरपाळे, माजी नगरसेविका प्रज्ञा खानोलकर, सुमन नेटके, अर्चना राऊत , नरेंद्र डोईफोडे आदी उपस्थित होते.
या वेळी शाळेतील शिक्षिका व विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. यात महिलांचे सशक्तिकरण व त्यांच्या सबलीकरणाबाबत संदेश देण्यात आला. तसेच लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले.