नद्यांच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र निधी द्या – नितीन गोरे

चाकण :टीम न्यू महाराष्ट्र

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची १८३ वी बोर्ड मीटिंग नुकतीच पार पडली. यावेळी बोर्ड सदस्य नितीन गोरे यांनी राज्यातील प्रमुख नद्या स्वच्छतेसाठी बोर्डाकडून स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करत प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मांडले व त्यावर त्वरित कार्यवाही करण्याची विनंती मंडळाला केली.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी सांगितले कि, वाढते प्रदूषण व बदलते वातावरणीय बदल त्यामुळे वाढणाऱ्या कामाची व्याप्ती तसेच सध्या उपलब्ध असलेले बोर्डातील मनुष्यबळ लक्षात घेता अधिकारी व कर्मचारी यांची संख्या वाढवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मंडळातील २००९ मध्ये भरती करण्यात आलेले क्षेत्र अधिकाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीच्या सुविधांसह ७ वा वेतन आयोग लागु करण्याची मागणी करण्यात आली. बोर्डातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा अपघाती विमा व मंडळाकडुन कुंटुबाला अर्थ साहाय्याची तरतुद करण्यावर चर्चा करण्यात आली. राज्यातील प्रमुख नद्या स्वच्छतेसाठी बोर्डाकडून स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. वाढत्या प्रदूषणामुळे व वातावरणीय बदलामुळे होणाऱ्या पर्यावरणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सर्व सरकारी आस्थपानांना त्यांच्या परिसरात अथवा पडीक जमिनीवर जास्तीत जास्त वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याच्या सूचना करण्यात आल्या. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी सालाबादप्रमाणे आषाढी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ … हा उपक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात आले.
तसेच अन्य महत्वाच्या विषयांना यावेळी मंजूरी देण्यात आली, सिंगल युज प्लास्टिक बंदी जनजागृती मोहिम राबविणे , पर्यावरण पूरक गणेशोत्सव अधिक व्यापक साजरा करण्यासाठी “शहाणपण देगा देवा” या संकल्पनेतून जनजागृती करण्यासाठी आर्थिक निधीची तरतूद करणे, सीड बॉल यंत्रे खरेदी करून प्रमुख शासकीय कार्यालयांना वितरित करणे , हॉस्पिटलचा जैविक कचरा व्यवस्थापन साठी बायोमेडिकल वेस्ट वेन्डरसाठी नवीन प्रस्ताव स्वीकारावे व काम सुरू करावे तसेच नदी प्रदूषण चे सर्वेक्षण आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.
यावेळी बोर्ड मीटिंगमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम, महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे (भा.प्र.से) तसेच मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे (भा.प्र.से), मंडळाचे सदस्य नितीन गोरे, आदित्य शिरोडकर, मंडळाचे विभागप्रमुख मोटघरे आदींसह सर्व अधिकारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply