पिंपरी: टीम न्यू महाराष्ट्र
संत साई हायस्कूल, भोसरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार व योगासने करून दाखविली.
यावेळी विनया वैष्णोई हिने योगा दिनाची माहिती दिली. शाळेचे बाल योग शिक्षक विक्रम वैष्णोई, सार्थक शेलार, झोहरा मोकाशी, अमेय साबळे यांनी योगासने सादर केली.
शाळेचे मुख्याध्यापक शिवलिंग ढवळेश्वर यांनी विध्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व सांगत दररोज अभ्यासाबरोबर शारीरिक कसरत करण्याचे आवाहन केले. ‘ शाळेच्या उपमुख्याध्यापिका रुपाली खोल्लम, स्वाती मोघे, संजय अनार्थे, स्मिता ढमाले, अक्षय राणे, भारती ढवळेश्वर योग दिनाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता नारायणगावकर यांनी केले.