आमदार शंकर जगताप यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा !!

नगरसेवक माऊली जगताप यांच्याकडून विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन

पिंपरी,7 एप्रिल( प्रतिनिधी): चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही डामडौल न करता सामाजिक बांधिलकी आणि युवा कौशल्याला व्यासपीठ देणारे विविध उपक्रम राबवण्यात आले. नगरसेवक ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप यांच्या संकल्पनेतून आणि आयोजनातून नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरात सांस्कृतिक आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.

नवी सांगवी येथील निळू फुले नाट्यगृहात आयोजित डान्स स्पर्धेला पिंपरी चिंचवडमधील बालकलाकार आणि तरुणांचा उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेविका पल्लवी जगताप यांच्या हस्ते झाले. तर बक्षीस वितरण नगरसेवक माऊली जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक नवनाथ जगताप उपस्थित होते. या स्पर्धेत छोटा गटात रुद्राक्षि देढे हिने प्रथम कीर्ती हिने द्वितीय तर संचित काळे याने तृतीय क्रमांक पटकावला. मोठ्या गटात आचल निकम प्रथम ईशा आढाव द्वितीय आणि प्रणिती कांबळे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. ग्रुप परफॉर्मन्समध्ये श्रेया आणि नेत्रा यांच्या जोडीने प्रथम तर सी ३ ग्रुपने द्वितीय आणि वाईल्ड बिट ग्रुपने तृतीय क्रमांक मिळवला. यावेळी मयूर सुभाष बोरा आणि पंकज सोनी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

आमदार शंकर जगताप यांनी दिलेल्या सूचनेनुसार वाढदिवसाचा खर्च टाळून तो समाजसेवेसाठी वापरण्याच्या उद्देशाने सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. नगरसेवक माऊली जगताप यांच्यासह माजी स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, सामाजिक कार्यकर्ते गणेश जगताप, गणेश बनकर, संजय मराठे, गिरीश देवकाते, राजू मोरे आणि रमेश गाढवे यांनी रुग्णांची विचारपूस करत त्यांना मदतीचा हात दिला. नेत्याचा वाढदिवस ही समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे असे प्रतिपादन यावेळी माऊली जगताप यांनी केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आमदार जगताप यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. या आवाहनाला प्रतिसाद देत माऊली जगताप यांनी नागरिकांसाठी मोफत पीयूसी तपासणी शिबिर आयोजित केले. वाढत्या प्रदूषणाविरोधात जनजागृती आणि पर्यावरणाप्रती जबाबदारी म्हणून नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. आमदार शंकरभाऊंनी नेहमीच समाजहित जोपासले आहे त्यांच्या विचारांना अनुसरूनच आम्ही यंदा उत्सवापेक्षा लोकसेवेला आणि विधायक कामांना प्राधान्य दिले असल्याचे माऊली जगताप यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply