पुणे : टीम न्यू महाराष्ट्र
उन्हाळ्यात तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी लोक बहुतेक वेळा नारळ पाणी पितात. पण तुम्हाला माहित आहे का नारळ तुमच्या अनेक समस्या दूर करण्यात देखील उपयुक्त आहे. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवायचे असेल तर नारळ खाणे फायद्याचे ठरते. नारळात फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे आतडे मजबूत राहतात आणि तुमची पचनक्रिया चांगली होते.
उन्हाळ्याच्या ऋतूत लोकांना पोटाच्या जळजळीचा जास्त त्रास होतो. अशावेळी नारळाचे सेवन करा. उष्माघात टाळम्यासाठी नारळाचे सेवन करावे. नारळ पाण्याचे सेवन केल्यास तुमचे शरीर थंड राहते. याने थायरॉईड फंक्शनची समस्या कमी होते. नारळात ब्रेन बुस्टिंग गुणधर्म आढळतात. त्यामुळे नारळाच्या सेवनाने मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि बुद्धी तल्लख होते. नारळाचे सेवन केल्यास तुमचे वजन नियंत्रित राहू शकते.