पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
भारताच्या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक असल्याचे मत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले. ‘वोट फार डेव्हलपमेंट’, ‘वोट फॉर मोदी’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत पिंपळे सौदागर भागातील विविध सोसायटीमधील उच्चशिक्षित रहिवाशांनी बारणे यांना पाठिंबा दिला.
खासदार बारणे यांनी शुक्रवारी संध्याकाळी पिंपळे सौदागर भागातील विविध सोसायट्यांना तसेच पदाधिकारी व मान्यवरांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. विवांता सोसायटी, जरवरी को-ऑपरेटिव्ह सोसायटी, रोझलँड रेसिडेन्सी, डॅफोडिल्स सोसायटी, कुंजीर रेसिडेन्सी, साई निसर्ग पार्क दोन आदी सोसायट्यांमधील रहिवाशांना भेटून खासदार बारणे यांनी संवाद साधला. त्यांच्या समवेत माजी नगरसेवक विठ्ठल तथा नाना काटे, शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, कुंदन जाचक, मनोज ब्राह्मणकर, सुदर्शन देसले आदी पदाधिकारी होते.
रोझलँड रेसिडेन्सीमध्ये उपाध्यक्ष विक्रम शिंदे, डॅफोडिल्स सोसायटीमध्ये अध्यक्ष राजू शेलार यांनी खासदार बारणे यांचे स्वागत केले. दोन्ही ठिकाणी झालेल्या कोपरा सभांमध्ये सोसायटीतील सभासदांनी बारणे यांच्या उत्स्फूर्त स्वागत केले. साई निसर्ग पार्क दोन सोसायटीत अध्यक्ष वीरेंद्र वारुडे, सचिव सुदर्शन देसले, मनीष सुपाते, मानसिंग वाघ यांनी बारणे यांचा सत्कार केला.
आम्हाला विकास हवा आहे. त्यामुळे आमचे मत नरेंद्र मोदींना पर्यायाने खासदार बारणे यांनाच राहील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या विकासाची गती कायम राखण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, असे बारणे यांनी सांगितले.
पिंपळे सौदागरमध्ये माजी नगरसेवक विठ्ठल तथा नाना काटे यांच्या कार्यालयात खासदार बारणे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यावेळी माजी नगरसेविका शीतल काटे याही उपस्थित होत्या. गावातील प्राचीन महादेव मंदिरात जाऊन बारणे यांनी आशीर्वाद घेतले. त्यावेळी अर्जुन काटे, मनोहर काटे, ज्ञानेश्वर हांडे, मुरलीधर काटे, विलासराव काटे, विजू काटे, गुलाब काटे, माऊली काटे, शंकर काटे आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार बारणे यांनी रामचंद्र जाचक, कुंदन जाचक, भानुदास काटे पाटील, भाजपचे ओबीसी मोर्चा महाराष्ट्र संपर्कप्रमुख मनोज ब्राह्मणकर, चंदन कुंजीर, वसंत काटे, विठ्ठल झिंजुर्डे, विजय काटे, लक्ष्मण कुंजीर, संदीप काटे, स्वप्नील काटे, प्रियंका काटे, जालिंदर साठे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. सर्व ठिकाणी बारणे यांचे स्वागत व सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संजय काटे यांच्या पेट्रोल पंपावरील कार्यालयासही खासदार बारणे यांनी भेट दिली.