पिंपरी , टीम न्यू महाराष्ट्र
जैन सोशल ग्रुप, तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी हितेश मांगीलालजी राठोड यांची एक मताने निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी इंद्रकुमार हस्तीमल ओसवाल, सचिवपदी समीर धनराज परमार तर खजिनदारपदी निलेश कांतीलाल ओसवाल यांची निवड जाहीर करण्यात आली असल्याची माहिती जैन सोशल ग्रुपचे माजी अध्यक्ष किरण ओसवाल यांनी दिली.
परम गुरुभक्त, सामाजिक कार्याची आवड असलेले हितेश राठोड यांना आजोबा कै. मानमलजी राठोड यांच्या कडून सामाजिक कार्याचा वारसा मिळाला. त्यांच्या निवडीचे जैन समाजामधून स्वागत करण्यात येत आहे.रविवारी (दि 21) सालाबाद प्रमाणे अहिंसेचे पुजारी श्री भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जैन भवन या ठिकाणी सकाळी 10 ते 1 वाजे पर्यंत करण्यात आलेले आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने रक्तदात्यांनी येऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
या निवडीचे वेळी मावळते अध्यक्ष संजय ओसवाल,राकेश ओसवाल, राजू शहा,विनोद राठोड,संजय सोलंकी,भरत राठोड हे सदस्य उपस्थित होते.