अमोल बालवडकर इंडिपेंडेंस डे रन”ला कोथरूडकरांचा उदंड प्रतिसाद

कोथरूड: टीम न्यू महाराष्ट्र

कोथरूडकरांचा स्वातंत्र्य दिन आरोग्यदायी करण्याच्या दृष्टीने अमोल बालवडकर फाउंडेशनने गुरुवारी मॅरेथॅान स्पर्धेचे आयोजन केले. यामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कोथरूडकर धावले. कोथरुड मतदार संघाबरोबरच पुणे शहरातील युवक-युवती, ज्येष्ठ नागरीक, महिला, मुलांनी हजारोंच्या संख्येने यात सहभाग घेतला.

कोथरुड येथील पंडीत फार्म येथे १५ ॲागस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमोल बालवडकर फाऊंडेशन व ॲटेनेक्स फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमानाने कोथरुड मतदार संघातील नागरीकांकरीता “अमोल बालवडकर इंडिपेंडेंस डे रन 2.0” चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोथरुड मतदार संघातील तसेच पुणे शहरातील युवक-युवती, ज्येष्ठ नागरीक, महिला, मुलांनी हजारोंच्या संख्येने उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. या मॅरेथॅानमध्ये 3 किमी, 5 किमी व 10 किमीचे टप्पे ठेवण्यात आले होते.

विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरीकांकरीता आयोजित केलेल्या “वॅाकेथॅान”ला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात आयोजित स्पर्धांना ज्येष्ठांनी आपला भरभरून प्रतिसाद दिला. सर्व सहभागी खेळाडुंना मेडल्स देवुन तसेच विजेत्यांना विविध बक्षिसे देवुन गौरवण्यात आले.

……………..

मॅरेथॉनच्या निमित्ताने नागरिक एकत्र यावेत. त्यातून त्यांच्यात संवाद घडावा आणि त्याचबरोबर नागरिकांचे आरोग्यही जपले जावे असा उद्देश या “अमोल बालवडकर इंडिपेंडेंस डे रन”चा होता. याला कोथरूडकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे युवकांचा मिळालेला प्रतिसाद लक्षणीय होता. नागरिकांनी दिलेल्या या प्रतिसादाचे नक्कीच कौतुक आहे. आगामी काळातही अशाच विधायक उपक्रमांना आम्ही प्राधान्य देणार आहोत.

– अमोल बालवडकर
माजी नगरसेवक तथा संस्थापक अमोल बालवडकर फाउंडेशन
…………………….

Share

Leave a Reply