भंगार व्यापाऱ्यांचा हजारो कोटींचा जीएसटीमध्ये गडबड घोटाळा ;परिवर्तन वाहतूक विकास आघाडीचा आरोप

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

व्यापारी आणि जीएसटी विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर डल्ला मारला आहे. यामध्ये नुकसान झालेल्या ग्राहक व व्यापाऱ्यांना दिलासा देण्याऐवजी कोट्यवधीचा महसूल स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचे शहर उपाध्यक्ष गोपाल कच्छवे यांनी मंगळवारी (दि.१८) पत्रकार परिषदेत केला.
पिंपरी चिंचवड परिवर्तन वाहतूक विकास आघाडी, शिव श्रमिक संघटना आणि सामुहिक गुंडगिरी, दहशतवाद, तंटा भ्रष्टाचार विरोधी संघटनेच्या वतीने
यावेळी अमित मोहिते, झोपडपट्टी सेलचे शहर अध्यक्ष सागर जाधव, सामूहिक गुंडगिरी, दहशतवाद, तंटा, भ्रष्टाचारविरोधी संघटनेचे विशाल मिठे आदी उपस्थित होते.

कच्छवे ,म्हणाले की, चिखली, कुदळवाडी येथील काही भंगार व्यवसाय करणारे व्यापारी मागील काही वर्षांपासून जीएसटी अकाउंटच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून, बनावट नावाने, त्रयस्थ व्यक्तींच्या नावे जीएसटीचे खाते उघडून हजारो कोटी रुपयांची कर चोरी करीत असल्याचे माहिती अधिकाराद्वारे मागवलेल्या माहितीतून सिद्ध झाले आहे. करचोरी करणारे मोठे रॅकेट सक्रिय असून, त्यांच्या माध्यमातून देशाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे. यातून अनेक उद्योजकांची फसवणूक केली जात आहे. ही बाब पुण्यातील जीएसटी विभागाचे अतिरिक्त महासंचालक देवेंद्र नागवेकर यांच्या निदर्शनास आणून देखील त्यांनी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे असा आरोप गोपल कच्छवे यांनी पत्रकार परिषद घेत यासंबंधित माहिती दिली.

Share

Leave a Reply