पालखीसाठी बॉम्‍ब शोधक व नाशक पथकासह चार हजार पोलिसांचा बंदोबस्‍त

पालखीसाठी बॉम्‍ब शोधक व नाशक पथकासह चार हजार पोलिसांचा बंदोबस्‍त

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा अनुक्रमे 28 आणि 29 जून रोजी प्रस्‍थान करणार आहे. हा सोहळा निर्विघ्‍नपणे पार पडावा यासाठी चार हजार पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्‍त असणार आहे. यामध्ये चार बॉम्ब शोधक व नाशक पथकांचाही समावेश आहे.

जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी 28 जून रोजी प्रस्‍तान करणार आहे. पालखीचा पहिला मुक्‍काम देहूतील इनामदार वाडा येथे असणार आहे. त्‍यानंतर दुसर्‍या दिवशीचा मुक्‍काम आकुर्डीतील खंडोबा मंदिरात असणार आहे. तिसर्‍या दिवशी म्‍हणजे 30 जून रोजी पालखी पुण्‍याकडे प्रस्‍थान करणार आहे.

तर श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा 29 जून रोजी प्रस्‍तान करणार असून पहिला मुक्‍काम आळंदीतील गांधीवाडा येथे होणार आहे. तर दुसर्‍या दिवशी म्‍हणजे 30 जून रोजी पालखी दिघीगाव मार्गे पुण्‍याकडे प्रस्‍थान करणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी फक्‍त राज्‍यातूनच नव्‍हे तर देशाच्‍या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक येत असतात. या कालावधीत वारकर्‍यांना त्रास होऊ नये म्‍हणून वाहतूक वळविण्‍यात आली आहे.

तर दुसरीकडे पालखी मार्गावर फेरीवाल्‍यांना बंदी घाण्‍याचे आदेश प्रभारी पोलीस आयुक्‍त सुनील रामानंद यांनी दिले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्‍या हद्‌दीत ज्‍या ठिकाणाहून पालखी जाणार आहे त्‍या मार्गावर इतर वाहनांना बंदी घालण्‍यात आली आहे. तसेच पालखी मार्गावर कोणीही आपली वाहने पार्क करू नयेत, असे आवाहनही पोलिसांनी स्‍थानिक नागरिक व वाहन चालकांना केले आहे. मात्र या बंदीतून अग्‍निशामक दल, रुग्‍णवाहिका आणि पोलिसांच्‍या वाहनांना सूट देण्‍यात आली आहे.

वारीच्‍या काळात गर्दीचा गैरफायदा घेत अनेक चोरटे या गर्दीत मिसळून मोबाइल, पाकीट, सोन्‍याचे दागिने लंपास करतात. यामध्‍ये महिला चोरट्यांचाही सहभाग असतो. ही बाब लक्षात घेऊन साध्‍या आणि वारकर्‍याच्‍या वेशातही पोलीस पालखीत असणार आहे. एखादा संशयित दिसला की त्‍याला लगेच ताब्‍यात घेण्‍यात येणार आहे. तसेच परिसरताील रेकॉर्डवरील गुंडांवरही प्रतिबंधात्‍मक कारवाई केली जाणार आहे. वारीवर लक्ष ठेवण्‍यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्‍ही कॅमेरे बसविण्‍यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी टॉवरवरून पोलीस गर्दीवर लक्ष ठेवणार आहेत.

Share

Leave a Reply