पिरंगुट-पुणे रोडवर वऱ्हाडाच्या बसला आग

पुणे : टीम न्यू महाराष्ट्र

पिरंगुट येथून पुण्याकडे जाणारी बस इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने अचानक पेटली. ही बस लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात होती. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत. ही घटना रविवारी (दि. 5) सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत माहिती अशी की, एक स्कूल बस (एमएच 12/ एसबी 3537) पिरंगुट येथून पुण्याकडे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात होती. मार्गात म्हसोबा मंदिराजवळ घाटात आल्यानंतर स्कूलबस मधील इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. बसला अचानक लागलेल्या आगीमुळे बसमधील वऱ्हाडी मंडळींची धावपळ उडाली. प्रसंगावधान राखत सर्व प्रवासी बस मधून खाली उतरले. त्यानंतर अग्निशमन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. कोथरूड अग्निशमन दलाच्या जवानांनी बसला लागलेली आग विझवली. या आगीमध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर वऱ्हाडी मंडळींची इतर वाहनातून घरी जाण्याची व्यवस्था करण्यात आली.

Share

Leave a Reply