भंडाऱ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात

भंडारा : भंडाऱ्यामधून मोठी घटना समोर आली आहे. भंडाऱ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून परतत असताना ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली. काल (मंगळवारी) रात्रीच्या सुमारास प्रचारांनतर सुकळी या गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या गाडीला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

Share

Leave a Reply