राष्ट्रपतींकडून छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या कामाचे चौकशीचे आदेश !

राज्याच्या मुख्य सचिवांना राष्ट्रपती कार्यालयाकडून सूचना

भाजपच्या भ्रष्ट आमदारांच्या कारभाराचे पितळ उघडे पडणार

पिंपरी, टीम न्यू महाराष्ट्र

पिंपरी चिंचवड शहरात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा महाविकास आघाडीने समोर आणला होता. या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाला आता थेट राष्ट्रपती भवनाकडून दुजोरा मिळत आहे. ”पुतळा उभारणीच्या कामात भ्रष्टाचार झाला असून याची निपक्षपातीपणे चौकशी करा” अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रपती कार्यालयाला शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून पाठवण्यात आले होते. या पत्राची दखल घेत राष्ट्रपतींनी राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबत तात्काळ चौकशी करावी. चौकशी बाबत तक्रार कर्त्यांना कळवावे असे सक्त आदेश दिले आहेत. या आदेशामुळे सत्ताधारी भाजप आमदारांच्या भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोशी येथे औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या जागेवर 100 फूट उंचीचा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळ्याच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केला होता. या संदर्भात त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवत या कामासंदर्भात चौकशी करावी अशी मागणी केली होती. या मागणीनंतर राष्ट्रपती कार्यालयाकडून दखल घेत राज्याच्या मुख्य सचिव पी.सी. मीणा यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ”राज्य सरकारने पुतळ्याच्या कामाबाबत चौकशी करावी. या चौकशी बाबत तक्रारदारांना अवगत करावे असे राष्ट्रपती कार्यालयाने दिलेल्या सूचनेत म्हटले आहे.

याबाबत मारुती भापकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी सुरवातीला मोशी, विनायकनगर या जागेवर चौथरा उभारण्याचे काम में धनेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला दि. 16 मार्च 2020 ला 12.50 कोटी रुपयाला देण्यात आले. या कामाची मुदत ही १८ महिने होती. वेळेत काम झाले नाही म्हणून पुन्हा 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदत वाढ देण्यात झाली. आजपर्यंत 40%, काम पुर्ण झाले त्याचे 5.50 कोटी रुपये बिल ठेकेदाराला अदा झाले आहे.

त्यांनतर जागेमध्ये बदल करण्याचे ठरले. मग झालेल्या 5.50 कोटी रूपये खर्च याला जबाबदार कोण ? हा प्रश्न उभा राहिलेला असतानाच दुसरा पुतळा उभारण्याचा घाट घालण्यात आला. आता नव्याने होणाऱ्या खर्चाचा आकडा मात्र गुलदस्त्यात ठेवण्याचा खटाटोप सुरू आहे. अशातच नवीन जागी पुतळा उभारण्यासाठी जागेची मागणी पीएमआरडीएकडे करण्यात आली. पीएमआरडीए हा शासनाचाच भाग असताना सुद्धा सदर जागेसाठी त्यांनी 49 कोटी 74 हजार 272 रुपयांची मागणी केली आहे. सदर जागा आज ताब्यात दिलेली असली तरी भविष्यात या जागे पोटी मोबदल्याची मागणी होऊ शकते. पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राच्या जागेमध्ये पुतळा उभारण्याची परवानगी मिळाल्यानंतर या जागेत चौथरा उभा करण्यासाठी पुन्हा पंधरा कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली.यासाठी ठेकेदाराशी संगणमत करण्यात आले.नियम व अटी शर्ती लागू करताना ठेकेदार डोळ्यासमोर ठेवण्यात आला. त्यामुळे नवीन जागेवर पुतळा उभारताना पुन्हा धनेश्वर कन्स्ट्रक्शन याच ठेकेदाराला चौथरा बांधण्याचे काम देण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा करणाऱ्या राम सुतार या दिल्ली येथील शिल्पकाराला 32 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आजपर्यंत या ठेकेदाराला महापालिकेतून 22 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या शिल्पाचे वेगवेगळे भाग जे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आणले गेले . ते एकत्र जोडणीनंतर पुतळा उभा राहणार आहे .त्या भागापैकी महाराजांच्या “मोजडी’ हा जो स्वतंत्र भाग मोल्डिंग करून तयार करण्यात आलेला आहे. त्यास तडा गेल्याचे दिसून आले. म्हणजेच पुतळा तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या धातू बद्दल शंका उपस्थित झाली आहे. आजपर्यंत पुतळा उभारणीच्या कामांमध्ये तब्बल 40 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

—————————

छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारणीमध्ये अनेक अक्षम्य चुका झालेल्या आहेत. या सर्व गोष्टींमुळे पिंपरी चिंचवड शहराची प्रतिमा मलीन करण्याचे काम सत्ताधारी करत आहे. राज्य शासनाकडून या सर्व प्रकाराची निपक्षपाती चौकशी होऊन सत्य परिस्थिती बाहेर येईल अशी अपेक्षा असल्याचे मारुती भापकर म्हणाले.

—————————

Share

Leave a Reply