युवा सेनेच्या सीईटी मॉक टेस्टला उदंड प्रतिसाद

पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र

युवासेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबवण्यात नुकत्याच आयोजित केलेल्या सीईटी  मॉक टेस्ट परीक्षा उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड शहर युवासेनेतर्फे पिंपरीगावातील नव महाराष्ट्र विद्यालयात ही परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेला पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

या परीक्षेला शहरातील ३१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेस आलेल्या विद्यार्थ्यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी  गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संजोग वाघेरे पाटील, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू,    अशोक वाळके,  अनिता तुतारे,  हरीश नखाते, रूपाली आल्हाट, वैशाली कुलथे, सुजाता नखाते, रंजनी वाघ, माधव मुळे, सतिश मरळ, तसेच युवा सेना चिंचवड़ विधानसभा प्रमुख विशाल नाचपल्ले, सुमित निकाळजे, कृष्णा माने, गोविंद शिंदे, गणेश जोशी, विनायक दळवी, संदेश देसले, योगिनी मोहन, वंदना वाल्हेकर, कमल गोडांबे, तस्मीन शेख, तसेच शिवसेना, युवासेना, शिवदूत, व महिला आघाडी च्या पदाधिकारी उपस्थित होते.

ही माॅक टेस्ट युवासेना शहरप्रमुख  चेतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. ही परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी युवासेना उपशहरप्रमुख प्रविण पाटील व  निखील दळवी यांनी  परीश्रम घेतले. या कामी नवमहाराष्ट्र विद्यालय व डॉ. संतोष पाचपुते  यांनी विशेष सहकार्य केले.

Share

Leave a Reply